महाभुलेख च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्व जमिनींची नोंद ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि यामागे लोकांची जमिनीचे व्यवहार करत असताना होणारी फसवणूक टाळणे हा उद्देश आहे आणि त्याच अनुषंगाने तंत्रज्ञानाचा वापर करून आपण घरबसल्या डिजिटल सातबारा उतारा, आठ अ उतारा, मालमत्ता पत्रक तसेच जमिनीचा नकाशा चेक करू शकतो.
ऑनलाइन पद्धतीने जमिनीचे सर्व रेकॉर्ड चेक करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही हे उत्तरे आपण फक्त माहितीसाठी वापरू शकतो आणि त्या अंतर्गत जमिनीचे एकूण क्षेत्रफळ, पिकांची माहिती तसेच इतर माहिती जाणून घेऊ शकतो.
महत्त्वाचे मुद्दे:
1. डिजिटल सातबारा घरबसल्या चेक करा
2. प्रत्येक गावाचा तसेच शहराचा भू नकाशा
3. राज्य शासनाकडून महत्त्वाची ऑफिशियल वेबसाईट जाहीर
4. मालमत्ता पत्रक, आठ अ तसेच क प्रत चेक करता येणार
5. जमीन फेरफार बद्दल माहिती
6. नावानुसार तसेच सर्वे नंबर, गट नंबर नुसार ऑनलाईन पद्धतीने जमीन नोंदी चेक करता येणार
Maha Bhulekh mahabhumi Online 7/12 Utara, 8 A, nakasha and land records
1. सातबारा उताराच्या माध्यमातून जमिनीची नोंद चेक करता येते तसेच जमिनीमध्ये कोणाकोणाची नावे आहेत ते फक्त येते.
2. डिजिटल सातबारा ऑनलाइन पद्धतीने बघण्यासाठी आपण राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ऑफिशियल वेबसाईट ची मदत घेऊ शकतो- bhulekh.mahabhumi.gov.in

3. ऑनलाईन सातबारा पाहण्यासाठी तुम्हाला सातबाराच्या वेबसाईट वरती विविध माहिती भरावी लागेल ज्यामध्ये जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करावे लागेल
4. जर तुम्ही संगणकावरून सातबारा उतारा चेक करत असाल तर तुम्हाला तिथे सर्वे नंबर आणि गट क्रमांक टाकावा लागेल
5. जर मोबाईल वरून चेक करत असाल तर तुम्हाला तिथे नाव किंवा आडनावाचा उपयोग करून जमिनीची माहिती चेक करण्याचा विकल्प दिसेल
6. आपण नावाच्या माध्यमातून सातबारा माहिती चेक कसे करायचे याबद्दल जाणून घेऊया
7. आपण आपल्या पूर्ण नावाचा किंवा प्रथम नाम तसेच आडनावाचा उपयोग करून सातबारा उतारा बघू शकतो.

8. तुम्ही तुमचे नाव टाका आणि तिथे शोधा किंवा सर्च बटनावरती क्लिक करून तुमच्या पुढे येणाऱ्या विविध नावांपैकी तुमचे नाव सिलेक्ट करा
9. जर तुमचं नाव वरती विविध ठिकाणी जमीन असेल तर तुम्हाला ज्या जमिनीचा सातबारा बघायचा असेल ती जमीननुसार विकल्प निवडावे लागेल
10. तुमचा मोबाईल क्रमांक निवडा आणि जर तुम्हाला इंग्रजी मध्ये सातबारा हवा असेल तर भाषेच्या पर्याया मधून तसे निवडा आपण मराठी भाषेसह पुढे जाऊया
11. वेबसाईटवर दिसणारा सांकेतिक क्रमांक योग्य पद्धतीने भरा आणि कॅपच्या व्हेरिफाय करा
12. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे नवीन पेज उघडेल च्या वरती जमिनीचा सातबारा उतारा दिसेल

महत्त्वाचे: जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा बघत असाल तर त्यावरती हा उतारा कोणत्याही शासकीय कामासाठी वापरला जाणार नाही असा शिक्का असतो त्यामुळे तो उतारा आपण फक्त माहितीसाठी वापरू शकतो परंतु सरकारी कामासाठी वापरू शकणार नाही
Maha Bhulelh Mahabhumi Abhilekh Maharashtra
महाभुलेख संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण घरबसल्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जमिनीचा सातबारा उतारा बघू शकतो आणि राज्य शासनाच्या वतीने यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे ज्या वरती सातबारा उतारा, 8अ उतारा, मालमत्ता पत्रक, क उतारा तसेच जमिनीच्या नकाशा बद्दल माहिती जाणून घेऊ शकतो.
राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे पोर्टल राज्यातील नागरिकांसाठी खूपच महत्त्वाचे ठरत आहे आणि यामधून फसवणुकीचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे कारण कोणताही जमिनीचा व्यवहार करण्याआधी कोणताही नागरिक जमिनीचे दस्तावेज आणि जमिन कोणाच्या नावावर आहे हे बघू शकतो.
राज्य शासनाच्या वतीने हे सातबारा तसेच इतर उतारे बघण्यासाठी कोणत्याही प्रकारचे लॉगिन करण्याची गरज नसते फक्त आपली माहिती योग्य पद्धतीने भरली की आपण जमिनीचे रेकॉर्ड चेक करू शकतो.
ऑनलाईन सातबारा चुकीचा असल्यास काय करायचे?
जर तुम्ही वर दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्या जमिनीचा ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा बघितलेला असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही बदल किंवा तफावत आढळून आलेले असेल तर त्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन माध्यमाचा उपयोग करावा लागेल.
ऑफलाईन माध्यमांमध्ये तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तलाठ्याकडे सातबारा उताऱ्यात जो बदल आवश्यक असेल तर तो बदल निदर्शनास आणून देऊन तलाठ्यांच्या मार्गदर्शनाखाली सातबारा उतारा मध्ये बदल घडवून आणावा लागेल.
राज्य भूमी अभिलेख कार्यालय संपर्क
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख कार्यालय तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल समोर, पुणे
दूरध्वनी : ०२०-२६०५०००६,
ई-मेल : dlrmah.mah[at]nic[dot]in