अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हायरल मेसेज प्रचंड गाजत आहे. यात दावा केला जातो की पंतप्रधान मोदी यांच्या नव्या योजनेअंतर्गत सरकार 1.5 कोटी नागरिकांना मोफत 5-स्टार एअर कंडिशनर (AC) देणार आहे. पण खरंच असं काही घडतंय का?नाही!
हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे. पीआयबी फॅक्ट चेक आणि ऊर्जा मंत्रालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे की अशा प्रकारची कोणतीही योजना जाहीर करण्यात आलेली नाही.
हा खोटा मेसेज व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर लोकांची फसवणूक करण्यासाठी पसरवला जात आहे. अनेकदा या मेसेजमागे फसवणुकीचे संकेतस्थळे, वैयक्तिक माहिती चोरी करण्याचा उद्देश असतो.
वापरकर्त्यांनी काय काळजी घ्यावी?
अधिकृत सरकारी संकेतस्थळांवरूनच माहितीची खातरजमा करा.
अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका.
अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका.
वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
अशा मेसेजची तक्रार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नोंदवा.